'सामना' वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

मुंबई - राज्यभर निघत असणार्‍या मराठा क्रांती मूक मोर्चावर काल (सोमवार) ‘सामना’तून विडंबनात्मक व्यंगचित्र छापून आले होते. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) दुपारी ठाण्यातील ‘सामना‘ वृत्तपत्राच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. 

छापून आलेल्या या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटत आहेत. दोन अज्ञात व्यक्तिंनी ही दगडफेक केली असल्याचे वृत्त आहे. नवी मुंबईतील वाशी येथील कार्यालयावर देखील अज्ञातांनी दगडफेक केली.

Web Title: Saamana's offices attacked after caricature mocking Maratha protests

टॅग्स