सचिन अहिरांसाठी मतदारसंघ ठरला; शिवसेनेत मात्र अंतर्गत नाराजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेत अंतर्गत नाराजी उफाळली असून सचिन अहिर यांच्यासाठी भायखळा मतदार संघावर शिक्कामोर्तब झाल्याने नाराजी समोर आली आहे.

मुंबई : सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेत अंतर्गत नाराजी उफाळली असून सचिन अहिर यांच्यासाठी भायखळा मतदार संघावर शिक्कामोर्तब झाल्याने नाराजी समोर आली आहे.

मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव नाराज असून यशवंत जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मातोश्रीवरुन बोलावणं आलं असल्याचे सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी यशवंत जाधव यांना बोलावले आहे. दरम्यान, भायखळा विधानसभा मतदार संघात यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin Ahir may Contest bhaykhala vidhansabha