सेनेच्या राजकीय अस्ताच्या अध्यायाला सुरवात; सचिन अहिरांचे ट्विट व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जुलै 2019

उद्धव ठाकरेंच्या गुजरात दौऱ्यावरुन अहिर यांनी ट्विट केलं होते. त्यामध्ये शिवसेनेच्या राजकीय अस्ताच्या अध्यायाला आज सुरुवात झाल्याचं अहिर यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे केवळ 5 महिन्यांपूर्वीच 18 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांनी हे ट्विट केलं आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत काल (ता.26) शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, अहिरांच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादी समर्थक नाराज झाले आहेत. अहिरांना वयाच्या 27-28 व्या वर्षीच पवारांनी आमदार केलं, मंत्री केलं, मुंबईचं अध्यक्षपदही दिलं, तरी त्यांनी विश्वासघात केला, असा आरोप राष्ट्रवादी समर्थकांकडून केला जात आहे. 

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर मात्र, राष्ट्रवादी समर्थकांकडून सचिन अहिर यांना त्यांच्या जुन्या ट्विटची आठवण करुन देण्यात येत आहे. सध्या, सोशल मीडियावर अहिर यांनी शिवसेनेवर टीका केलेलं एक ट्विट व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरेंच्या गुजरात दौऱ्यावरुन अहिर यांनी ट्विट केलं होते. त्यामध्ये शिवसेनेच्या राजकीय अस्ताच्या अध्यायाला आज सुरुवात झाल्याचं अहिर यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे केवळ 5 महिन्यांपूर्वीच 18 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांनी हे ट्विट केलं आहे. 

भाजपसमोर पडतं घेत सेनेच्या वाघाने सत्तेसाठी स्वाभिमानाचं शेपूट घातलं. राजीनामे चोथा झाले. पहिले मंदिर बाद मे सरकार म्हणणारे भिकेचा कटोरा घेऊन अमित शहाच्या अधीन झाले असे ट्वीट सचिन अहिर यांनी केले होते.

Image may contain: text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Ahirs old tweet went viral