सचिन चौधर व नायब तहसिलदार हनुमंत जगताप यांचा सत्कार

नंदकिशोर मलबारी
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सरळगांव - प्रशासनाने दिलेली जबाबदारी वेळीच पूर्ण करून दिलेल्या महत्वाच्या उपक्रमात उल्लेखनीय कामांबद्दल मुरबाडचे तहसिलदार सचिन चौधर व नायब तहसिलदार हनुमंत जगताप यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.  

महसूल दिनाचे अवचित्य साधत आयोजीत केलेल्या कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. 125 ग्रामपंचायती असलेला व भौगोलिक क्षेत्र मोठा असलेला हा तालुका. या तालुक्यात अनेक प्रश्नांना सामोरे जाऊन त्यात मार्ग काढण्याची लकब असलेले मुरबाडचे तहसिलदार सचिन चौधर व नायब तहसीलदार हनुमंत जगताप यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाल्याने व मुरबाडमध्ये प्रशासकीय काम करत असताना पालक मंत्री यांच्या हस्ते सत्कार होण्याची ही पहिलीच घटना असल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार असो की मुरबाड शहरात लागलेली आग असो ही अधिका-यांची जोडी हजर असल्याने अनेक वेळा जनतेकडून कौतूक झाले आहे.  या दोन्ही अधिका-यांचे प्रशासकीय कामात उल्लेखनीय कामा बद्दल पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 

Web Title: Sachin Chauhar and Naib Tehsildar Hanumant Jagtap felicitated