'सचिन कप्तान असण्यापेक्षा चांगला नेता'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई - सचिन तेंडुलकर कप्तान असण्यापेक्षा चांगला नेता आहे. कारण- एक पिढी त्याच्याबरोबर घडली आहे. नेतृत्वगुणांचे विविध कंगोरे क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी उलगडले. तसेच कोणतीही गोष्ट स्वत: करण्यापेक्षा करवून घेणे अवघड असल्यानेच नेतृत्व हे महत्त्वाचे ठरत असते. याबाबतचे अनेक किस्से लेले यांनी या वेळी सांगितले.

मुंबई - सचिन तेंडुलकर कप्तान असण्यापेक्षा चांगला नेता आहे. कारण- एक पिढी त्याच्याबरोबर घडली आहे. नेतृत्वगुणांचे विविध कंगोरे क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी उलगडले. तसेच कोणतीही गोष्ट स्वत: करण्यापेक्षा करवून घेणे अवघड असल्यानेच नेतृत्व हे महत्त्वाचे ठरत असते. याबाबतचे अनेक किस्से लेले यांनी या वेळी सांगितले.

सुनंदन लेले यांनी आंतरराष्ट्रील क्रिकेट खेळाडूच्या नेतृत्वगुणांचे किस्से सांगत लीडरशिपची अनोखी कार्यशाळा यानिमित्ताने घेतली. सौरव गांगुलीपासून महेंद्र धोनीपर्यंतचे खेळाडू मोठे होण्यामागे त्यांच्यात असणारे असे कोणते गुण होते की ज्यामुळे ते वेगळे ठरत होते आणि त्यांचे नेतृत्व मान्य केले जात होते? याबद्दल मुलांच्याच भाषेत संवाद साधत त्यांनी बहार आणली.

नेतृत्च, गुणग्राहकता, अभिमान, आदर व सर्वोत्तम हे सर्व गुण नेतृत्व करताना कसे आवश्‍यक आहेत, याविषयी लेले यांनी क्रिकेटच्या महान खेळाडूंविषयीचे त्यांचे निरीक्षण सांगितले. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाचा उल्लेख करताना लेले यांनी सांगितले की गांगुली त्याच्या कारकिर्दीत सेहवाग, झहीर, युवराज, हरभजन यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यांच्यावर विश्‍वास टाकून अनेक संधी दिल्याने हे खेळाडू बहरले. इम्रानखानला हिऱ्याची पारख होती. त्याने इंजमाम या खेळाडूला कुठेतरी खेड्यात खेळताना पाहिले आणि त्याला थेट वर्ल्ड कपला सगळ्यांचा विरोध असताना घेऊन गेला. पहिल्या चार मॅचमध्ये तो खेळला नाही; पण सेमी फायनल त्यानेच जिंकून दिली. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव वॉने तर त्याच्या टीमचा देशाभिमानच इतका जागवला की सलग कितीतरी सामने ते जिंकले होते.

गाव-खेड्यांतून आलेल्या महेंद्रसिंग धोनीचे नेतृत्व सचिन तेंडुलकरपासून राहुल द्रविडपर्यंत सर्वांनीच मान्य केले. मैदानाबाहेर समोरून सचिन येत असेल तर धोनी बाजूला होत असे. विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचाही जाता जाता उल्लेख करताना लेले यांनी सांगितले की, विराटचा फिटनेस, अभ्यास एवढा आहे की त्याच्याबरोबरीने येण्यासाठी इतर खेळाडूंची खूप पळापळ होते.

Web Title: Sachin good leader