बँकांना डुबवण्यामध्ये पूनम महाजनही : सावंत 

बँकांना डुबवण्यामध्ये पूनम महाजनही : सावंत 

मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघांत 29 एप्रिल रोजी मतदान होत असतानाच उत्तर-मध्य-मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार पूनम महाजन यादेखील बॅंकांना डुबविण्यामध्ये सामील असल्याचा सनसनाटी आरोप कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

सावंत म्हणाले की, भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन या "सिबिल'नुसार हेतुपुरस्सर थकबाकीदार म्हणजेच "विलफुल डिफॉल्टर' आहेत, असा आरोप सावंत यांनी केला.

विलफुल डिफॉल्टरच्या यादीत नीरव मोदी, विजय मल्ल्यासारख्या अनेकांबरोबरच पूनम महाजन त्यांचेही नाव आहे. पूनम महाजन पतीच्या कंपनीकडे थकबाकी असलेल्या 11.40 कोटी रुपयांच्या कर्जाकरिता जामीनदार म्हणून थकबाकीदार आहेत; परंतु ही बाब त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लपवली आहे. यासंदर्भात त्यांच्यावर बॅंकेने दावादेखील दाखल केलेला आहे. ही बाब जनतेपासून लपवणे, हे अत्यंत गंभीर अशा तऱ्हेचे कृत्य आहे; म्हणूनच भाजपसारखा नैतिकेचा बुरखा बाळगणाऱ्या पक्षाला याचे उत्तर देणे गरजेचे आहे, असे सावंत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com