'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनचा चौथ्या टप्पा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यातच मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे.

मुंबई- कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनचा चौथ्या टप्पा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यातच मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तसंच भाजपनं आजपासून राज्यभरात महाराष्ट्र बचाओ आंदोलन करत आहेत. दुसरीकडे भाजपनं सरकारवर केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्त्युतर दिलं आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट

भाजपनं सरकारवर टीका करणारा एक व्हिडिओ ट्विट केला होता. हा व्हिडिओ मुंबईतल्या रुग्णालयातील कोरोना रुग्णांची व्यथा दाखवणारा आहे. भाजप महाराष्ट्र या भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या ट्विटमध्ये भाजपनं म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. क्वांरटाईनची सोयीसुविधा असतील, रुग्णालय असतील, पेशंटची गैरसोय होत आहे. लॉकडाऊन 4 सुरु झाले. पण राज्य सरकारकडे अजूनही काही ठोस पाऊलं उचलताना दिसत नाही आणि नियोजनाचा अभाव जाणवत असल्यामुळे सामान्य जनता आणि कोरोना वॉरियर्स सुद्धा त्रस्त झाले आहे. 

भाजपच्या या टीकेला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. भाजपचं ट्विट रिट्विट केलं आहे. भाजप जनतेमध्ये असंतोष पसरवण्याचा कुटील डाव करत असल्याचं सचिन सावंत यांनी म्हणत भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसंच भाजपच्या आयटी सेलवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भाजपचं राज्यभर 'महाराष्ट्र बचाओ आंदोलन'

 

सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, महिन्याभरापूर्वीचा व्हिडिओ टाकून जनतेमध्ये असंतोष पसरवण्याचा भाजपा कुटील डाव आहे. हा खोटारडा प्रकार संतापजनक आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील महाराष्ट्र विरोधी भाजपच्या आयटी सेलवर कारवाई करा. 

सचिन सावंत यांची भाजपच्या महाराष्ट्र बचाओ आंदोलनावर टीका 

भाजपनं आजपासून राज्यभरात महाराष्ट्र बचाओ आंदोलन करत आहेत. राज्यातली आणि मुंबईतील कोरोनाची समस्या पाहता दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यावरुनच राज्य सरकार निष्क्रिय झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. राज्यातल्या महाविकास आघाडीला कोरोनाबाबत जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं भाजपनं सांगितलं आहे. कोरोना व्हायरसला राज्यात रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूनं हे आंदोलन पुकारलं असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

कचरा वर्गीकरणाची व्याख्या बददली, आता 'या' पद्धतीने करायचं कचऱ्याचं वर्गीकरण, नाहीतर...

यावर सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे आंदोलन हे महाराष्ट्र विरोधी आंदोलन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सावंत यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, महाराष्ट्र बचाओ आंदोलन नव्हे हे तर महाराष्ट्र विरोधी पक्षाचे आणि महाराष्ट्र विरोधी पक्षाच्या नेत्यांचे महाराष्ट्र विरोधी आंदोलन. 

भाजप जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन देणार 

महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी आज भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मुख्यमंत्री तसंच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन देणार आहेत. तर शुक्रवारी लाखो कार्यकर्ते, पदाधिकारी आपापल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील त्या फलकांवर सरकारविरोधात घोषणा लिहिलेल्या असतील. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही हातावर पोट असलेल्यांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे.

sachin sawant targets bjp lockdown politics in maharashtra seen in maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin sawant targets bjp lockdown politics in maharashtra seen in maharashtra