सुशांत सिंह प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेला संदीप सिंह फडणवीसांसोबत होता एकाच व्यासपीठावर, सचिन सावंतांचं ट्विट

सुमित बागुल
Friday, 28 August 2020

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी एकीकडे CBI ने चौकशी सुरु केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण देखील तापलंय.

मुंबई  : सुशांत सिंग राजपूत प्रकरणी एकीकडे CBI ने चौकशी सुरु केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण देखील तापलंय. भाजपचे नेते नाव न घेता शिवसेनेच्या तरुण मंत्र्याला टार्गेट करत्यात. तर शिवसेनेकडूनही याला जशास तसं उत्तर देण्यात येतंय.

आता याप्रकरणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक ट्विट करत थेट महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात चित्रपट निर्माता संदीप सिंह वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. संदीप सिंह आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याचा फोटो सचिन सावंत यांनी ट्विट केलाय. या प्रकरणी आता सचिन सावंत यांनी तपासणीची मागणी केलीये.

मोठी बातमी - मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी, नक्की वाचा

या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही टॅग केलेलं आहे. या माध्यमातून सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेला निर्माता संदीप सिंह याच्या पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाचं पोस्टर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलंय.

मोठी बातमी -  मध्य रेल्वे मार्गावर अखेर QR कोड स्कॅनिंग सुरू; 1 लाख 80 हजार 400 प्रवाशांना QR कोड वितरीत

रियाची CBI चौकशी 

CBI ने रिया चक्रवर्तीला आज समन्स पाठवलाय. त्यानंतर रिया चक्रवर्ती आता DRDOच्या गेस्टहाउसवर पोहोचली आहे. रियासोबत त्यांचा भाऊ शोविक आणि सिद्धार्थ पिठानी हा देखील DRDO च्या गेस्टहाउसवर पोचलेत.

sachin sawant tweets photo of sandip singh and devendra fadanavis sharaing the stage


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin sawant tweets photo of sandip singh and devendra fadanavis sharaing the stage