'सचिनऽऽऽ सचिनऽऽऽ' घोषणा माझ्या आईची..!

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

सचिनने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून, सध्या तो त्याचा चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. 'सचिन सचिन' हे शब्द आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील, असे सचिनने म्हटले आहे.

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात उतरला की 'सचिन सचिन' ही अख्ख्या स्टेडियमभर दुमदुमणारी घोषणा सर्वप्रथम माझ्या आईने दिल्याचे सचिनने स्वतः सांगितले.

'सचिन ए बिलियन ड्रीम्स' या चित्रपटातील गाण्याच्या प्रदर्शनावेळी बोलताना सचिनने ही माहिती दिली. सचिन म्हणाला, की मी जेव्हा लहानपणी खाली खेळण्यासाठी जात होतो. तेव्हा आई घरी पुन्हा बोलविण्यासाठी 'सचिन सचिन' असा आवाज द्यायची. त्यावेळी सर्वप्रथम मी हे ऐकले होते. मी कधीही विचार केला नव्हता की 'सचिन सचिन' ही घोषणा माझ्या कारकिर्दीच्या काळातही दिली जाईल. आता चित्रपटगृहातही दिली जात असल्याने मी खूप आनंदी आहे.

सचिनने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून, सध्या तो त्याचा चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. 'सचिन सचिन' हे शब्द आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील, असे सचिनने म्हटले आहे.

Web Title: Sachin Tendulkar says his mother started the ‘Sachin, Sachin’ chant