सचिन तेंडुलकर करणार रेल्वे प्रवाशांत जागृती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

मुंबई - पश्‍चिम रेल्वेने रूळ ओलांडण्यातील धोके, महिला प्रवासी सुरक्षा व स्वच्छता या गंभीर मुद्द्यांवर विशेष जागरूकता अभियान राबवले आहे. याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सचिन तेंडुलकर पश्‍चिम रेल्वेच्या मदतीला धावला आहे. 

पश्‍चिम रेल्वेने अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून नुकतेच सेलिब्रिटींच्या मदतीने प्रवासी जागरूक अभियान सुरू केले आहे. यात सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ, जॉन अब्राहम आणि अन्य अभिनेत्यांचे व्हिडीओ पोस्ट करण्यात येणार आहेत. यापाठोपाठ सचिनलाही या अभियानात सहभागी करून घेतले आहे. लवकरच त्याचे ऑडिओ-व्हिडीओ एलसीडी व एलईडी स्क्रीनवर दाखवले जातील. टीव्ही चॅनेल, चित्रपटगृह, एफएम, रेडिओच्या माध्यमातूनही ते लोकांपर्यंत पोहचवण्यात येतील. काही अभिनेत्रींचाही उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांना दिली. 

Web Title: Sachin Tendulkar will raise awareness of rail passengers