सचिन वाझे प्रकरणाचे धागेदोरे इंडियन मुजाहिद्दीनशी? तिहारमध्ये दहशतवाद्याची चौकशी

waze.jpg
waze.jpg

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टाने काल सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील कारमधील स्फोटक प्रकरणात शनिवारी रात्री उशिरा सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही सचिन वाझेंवर संशय आहे. एनआयए स्फोटक प्रकरणाचा तपास करतेय, तर एटीएसक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे. 

या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. शनिवारी तिहार तुरुंगात इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तेहसीन अख्तरची दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने तब्बल चार तास चौकशी केली. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात ही चौकशी करण्यात आली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

तिहार जेलमध्ये अख्तरच्या बॅरकमध्ये जो मोबाइल फोन सापडला, त्याचा वापर टेलिग्राम चॅनल बनवण्यासाठी झाल्याचा संशय आहे. या टेलिग्रॅम चॅनलवरुनच जैश-उल-हिंद या संघटनेने स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या घराबाहेर पार्क केल्याची जबाबदारी स्वीकारली होती. 

वाझेंना अटक होणं ही साधीसुधी बाब नाही
फेब्रुवारी महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार सापडली. त्यानंतर काही दिवसांनी या स्कॉर्पियो कारशी संबंधित असलेल्या  मनसुख हिरेन यांचा ठाण्याच्या खाडीत मृतदेह सापडला, आणि आता स्फोटक प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक, यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. एनआयने सचिन वाझे यांना अटक करणे ही साधीसुधी बाब नाही. कारण देशातील एका केंद्रीय तपास यंत्रणेने राज्य पोलीस दलातील महत्त्वाच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com