सद्‌गुरू वामनराव पै. यांचा सहवास म्हणजे परिसस्पर्श : नितीन गडकरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

सद्‌गुरुचा परिसस्पर्श झाल्यानंतर सोन्यासारखी झळाळून निघतात. असे जीवनविद्या मिशनच्या कार्याविषयी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गौरवोद्‌गार काढले.

वाशी : व्यक्ती ही कोणत्याही कार्यात फार मोठी शक्ती असते आणि मौल्यवान व्यक्ती निर्माणाचं कार्य जीवनविद्या मिशनकडून केले जात आहे. सुशिक्षित व्यक्ती असतात, पण सद्‌गुरुंच्या सहवासात आल्यावर माणसं सुसंस्कृतही होतात. सद्‌गुरुचा परिसस्पर्श झाल्यानंतर सोन्यासारखी झळाळून निघतात. असे जीवनविद्या मिशनच्या कार्याविषयी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गौरवोद्‌गार काढले.

जीवनविद्या मिशनचे शिल्पकार सद्‌गुरू वामनराव पै यांच्या जन्मदिनानिमित्त 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान घणसोलीतील एस. पी. शाळेसमोरील क्रीडांगणात आयोजित सद्‌गुरू वामनराव पै दिव्यस्मरण महोत्सवाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता.8) नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, तसेच जीवनविद्या मिशनचे प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै आदी उपस्थित होते. 

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, सद्‌गुरुंच्या विचारामुळे आपल्या सर्वांचं कल्याण होत आहे. विश्‍वाचंही कल्याण व्हावं असा व्यापक विचार जीवनविद्या मिशनने मांडला आहे. जीवनविद्या मिशनचे कार्य हे कोणत्याही व्यक्तिपुरतेच मर्यादित नाही तर ते व्यापक आहे, असेही गडकरी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadhguru Vamanrao Pai. Their cohabitation is touching: Nitin Gadkari