बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंहांची मोटारसायकल साक्षीदारांनी ओळखली

sadhvi pradnya thakur
sadhvi pradnya thakur

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटात वापरलेली आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची मोटारसायकल आज विशेष न्यायालयात आलेल्या साक्षीदारांनी ओळखली. न्या. विनोद पडळकर यांनी न्यायालयाच्या आवारात जाऊन या बाईकची पाहणी केली. मोबाईल टॉर्चचा वापर करुन पाहणी करीत असताना त्यांच्या कपड्यावरही ग्रीसचे डाग पडल्याचे पाहायला मिळाले. 

न्यायालयाच्या आवारात एका टेम्पोमध्ये ही बाईक ठेवलेली आहे. बॉम्बस्फोटाच्या दिवशी हीच बाईक वापरली होती, असे आज प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितले. न्या. पडळकर यांनीही टेम्पोमध्ये शिरून बाईकची पाहणी केली. टेम्पोमध्ये काही सायकलीही पुरावे म्हणून दाखल केले आहेत. न्यायाधिशांसह काही कर्मचारी आणि वकिलही यावेळी आवारात उपस्थित होते.

एलएमएल या कंपनीची ही बाईक असून त्यावर फ्रिडम असे लिहिलेले आहे. मात्र बाईकचा मागील भाग खराब झाला असून पुढील भाग ठीकठाक होता. सायकलींची अवस्थाही खराब झालेली होती. साध्वी प्रज्ञा यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपामध्ये त्यांची मोटारसायकल वापरली, हा एक महत्वाचा आरोप आहे. आजच्या जबानीमुळे साध्वी प्रज्ञा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये सप्टेंबर 2008 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com