पुजारी टोळीचा शार्प शूटर सादिक बंगालीला अटक, पिस्तुल आणि काडतुसे जप्त

crime
crimesakal media

मुंबई : कुख्यात रवी पुजारी (ravi Pujari) आणि सुरेश पुजारी या टोळीचा शार्प शूटरच्या खंडणी विरोधी पथकाने (anti extortion cell) मुसक्या आवळल्या आहेत. सादिक बंगाली ( Sadik bangali) असे या आरोपीचे नाव असून, याचा अधिक तपास सुरू आहे. बंगाली याला मुंबईतील (Mumbai Cotton Green) कॉटन ग्रीन येथून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने बंगाली याच्याजवळून दोन पिस्तुल आणि 15 काडतुसे जप्त केली आहे. मुंबई पुण्यात (Mumbai-pune) सादिक बंगाली याच्यावर 15 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद (FIR) असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिली. ( Sadik bangali Arrested in mumbai by anti extortion cell-nss91)

crime
संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेला जामीन मंजूर - HC

सादिक बंगाली (44) हा मूळचा पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे राहणारा आहे. एक जण शस्त्राची विक्री करण्यासाठी कॉटन ग्रीन एअर फोर्स रोड या ठिकाणी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना मिळाली होती. यामाहिती वरून खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून मोटारसायकल वरून आलेल्या एकाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती ही सादिक बंगाली असल्याचे समोर आले. सादिक बंगाली हा रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीचा शार्प शूटर असून त्याच्याविरुद्ध मुंबई पुण्यात हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे 15 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

रवी पुजारी याच्या सांगण्यावरून सादिक याने बॉलिवूड मधील चित्रपट निर्माते, बांधकाम व्यवसायिकाना धमकावणे, त्याच्यावर गोळीबार करणे या प्रकारचे गुन्हे करीत होता. रवी पुजारीच्या अटकेनंतर सादिक हा पुण्यातील एका खेड्यात लपून बसला होता. रवी पुजारीच्या अटकेनंतर सादिक याला काम मिळत नसल्यामुळे त्याने त्याच्याकडे असलेले शस्त्र विकण्याचा बेत आखला आणि पकडला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com