उल्हासनगरमधील व्यावसायिक सागर उटवाल यांचा शिवसेनेत प्रवेश

दिनेश गोगी
मंगळवार, 22 मे 2018

ओमी कलानीचे विश्वासू सागर उटवाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

उल्हासनगर - ओमी कलानीचे विश्वासू सागर उटवाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उटवाल यांच्यासोबत मोठ्या संख्येने युवा ब्रिगेडही शिवसेनेत आल्यामुळे ओमी कलानीची टीम पोखरली आहे. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, विरोधीपक्षनेते धनंजय बोडारे आदी उपस्थित होते.

फेब्रुवारी 2017 मध्ये पार पडलेल्या पालिका निवडणुकीत टीम ओमी कलानी सोबत इमानेइतबारे काम केले. मात्र त्यांच्या टीममधील काही सदस्य चुकीची माहीती पुरवत असल्याने घुसमट होत होती. ओमी कलानी सोबत वैयक्तिक चांगले संबंध आहेत. मात्र होणाऱ्या घुसमटीमुळे अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे टीम मधून बाहेर पडलो असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापुढे शिवसेनेशी प्रामाणिक राहून पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असे सागर उटवाल यांनी सांगितले.

Web Title: sagar utwal enters in shivsena