साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे 

Sadanand-More
Sadanand-More

मुंबई - महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने बुधवारी ही घोषणा केली.

राज्य सरकारच्या अखत्यारीतील मराठी भाषा विभागांतर्गत राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. डॉ. सदानंद मोरे यापूर्वी पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सारथी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. 

साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करताना राज्य सरकारने गिरीश प्रभुणे, अशोक राणे, अरुण शेवते, भारत सासणे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, संदीप खरे, आसाराम कसबे, ज्योतीराम कदम, उत्तम बंडू तुपे, रेणू पाचपोर, आशुतोष अडोणी, रवींद्र गोळे, सिसिलिया कार्व्हालो, उमा कुलकर्णी, सुप्रिया अय्यर, डॉ. विद्या पाटील, फरझाना डांगे, उषा परब, राणी दुर्वे, सुधीर पाठक, ए. के. शेख, विजय पाडळकर, जगन्नाथ शिंदे, अशोक सोनावणे, डॉ. रणधीर शिंदे, लखनसिंग कटारे, अरुण करमकर, शंकर धडके, संजय ढोले, देविदास पोटे, रमेश पवार, डॉ. उत्तम रुद्रावतार, डॉ. मधुकर वाकोडे आदींची सदस्य म्हणून नेमणूक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com