म्हणे, डायरेक्ट आयपीएस अधिकारी बनवतो; पण झाली तब्बल 3 कोटींची फसवणूक

अनिश पाटील
Monday, 28 September 2020

आयपीएस अधिकारी बनवण्याचे आमीष दाखवून साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांची एसआयटी व मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना मुंबईतून अटक केली.

मुंबई - आयपीएस अधिकारी बनवण्याचे आमीष दाखवून साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांची एसआयटी व मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना मुंबईतून अटक केली. आरोपींनी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स व नॅशनल पोलिस अकादमी, हैद्राबाद नावाने बनावट पत्र दिले होते.

'सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशीचे थेट प्रक्षेपण, आयपीएल प्रमाणेच हक्कांचा लिलाव करा'; सचिन सावंत यांचा भाजपला टोला

पुनीत कृष्णकुमार रलहान(26) व सपना पुनीत रलहान अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघांनाही जोगेश्वरी येथील ओशिवरा परिसरातील घरातून गुन्हे शाखेच्या कक्ष 10 च्या पोलिसांनी अटक केली. त्यांना जालंधर पोलिसांच्या विशेष पथकाच्या स्वाधीन देण्यात आले आहे. आरोपींनी अनेकांना अशा पद्धतीने फसवणल्याचा संश आहे. त्यांच्याविरोधात जालंधर शहरातील डीविजन 3 पोलिस ठाण्यात भादंवि कलम 406, 420, 465, 467, 468, 471, 120(ब) व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

आरोपींनी पंजाब पोलिस दलात उपअधिक्षक व दिल्ली पोलिस दलात आयपीएस अधिकारी बनवण्याचे आमीष दाखवून अनेकांकडून पैसे घेतले होते. त्या बदल्यात आरोपींनी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स व नॅशनल पोलिस अकादमी, हैद्राबाद नावाने बनावट पत्र दिले होते. जालंधर पोलिसांच्या विशेष पथकाच्या तपासात आरोपी मुंबईत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मुंबई पोलिसांकडे मदत मागितली असता कक्ष 10 च्या पोलिस पोलिसांनी आरोपींना अटक केली.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That said Direct makes IPS officers But there was a fraud of Rs 3 crore