... अन्यथा सरकारी अधिकाऱ्यांविरोधात हक्क भंग- आमदार नरेंद्र पवार

रविंद्र खरात 
सोमवार, 19 जून 2017

 कल्याण रेल्वे स्थानक जवळील स्कायवॉक़ आणि स्टेशन परिसरचा पाहणी दौरा आज सोमवार ता 19 रोजी भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी केला , त्यांच्या दौऱ्यात स्कायवॉक वर घाणीचे साम्रज्य आणि फेरिवाल्यांचे सामान पाहुन आमदार पवार चांगलेच संतापले , त्यांनी पालिका , रेल्वे पोलिस , रेल्वे सुरक्षा बल , आणि स्थानिक पोलिसांची चांगलीच हजेरी घेत , 15 दिवसात मी कधी ही येथे पाहणी करेन , स्वच्छता पाहिजे , फेरीवाले दिसले तर आगामी पावसाळी विधीमंडळ अधिवेशन मध्ये हक्क भंग आणणार असा यावेळी इशारा दिला .

कल्याण- कल्याण रेल्वे स्थानक जवळील स्कायवॉक़ आणि स्टेशन परिसरचा पाहणी दौरा आज सोमवार ता 19 रोजी भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी केला , त्यांच्या दौऱ्यात स्कायवॉक वर घाणीचे साम्रज्य आणि फेरिवाल्यांचे सामान पाहुन आमदार पवार चांगलेच संतापले , त्यांनी पालिका , रेल्वे पोलिस , रेल्वे सुरक्षा बल , आणि स्थानिक पोलिसांची चांगलीच हजेरी घेत , 15 दिवसात मी कधी ही येथे पाहणी करेन , स्वच्छता पाहिजे , फेरीवाले दिसले तर आगामी पावसाळी विधीमंडळ अधिवेशन मध्ये हक्क भंग आणणार असा यावेळी इशारा दिला .

कल्याण रेल्वे स्थानक परिसर फुटपाथ आणि स्कायवाक़ वर फेरिवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना स्टेशन गाठन्यास अड़चण येत आहे , याबाबत दैनिक सकाळ मध्ये  बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. स्वर्गीय दिन दयाल उपाध्याय जन्म शताब्दी वर्ष सोहळा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यात नागरिकांनी स्टेशन परिसर मधील समस्या मांडल्याने आज सोमवार ता 19 जून रोजी कल्याण पश्चिम भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी सकाळी 10 वाजता स्टेशन परिसर पाहणी दौरा केला , दौरा होणार म्हणून फेरीवाले गायब होते मात्र तरीही आमदार पवार यांनी दौऱ्याला सुरुवात झाली , यावेळी स्कायवॉक़ वर घाणीचे साम्राज्य आणि फेरिवाल्यांचे सामान पाहुन आमदार नरेंद्र पवार हे चांगलेच संतापले , पालिका उपायुक्त सुरेश पवार , मधुकर शिंदे यांची हजेरी घेत सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित माने यांची ही खरडपट्टी काढली. यावेळी फेरिवाल्यांनी लपवून ठेवलेले फ़ळ आणि भाज्या घाणीच्या ठिकाणी ठेवलेले समोर आल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याशी खेळु नका , असा दम देत आज सोमवार ता 19 रोजी दुपारी 2 वाजे पर्यन्त स्कायवाक़ साफसफाई करा आणि फेरिवाल्यांचे सामान जप्त करण्याचे सूचना देत 15 दिवसात कधी ही पाहणी करेन त्यावेळी स्कायवॉक़ आणि स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आणि स्वच्छ हवा , तसे न झाल्यास आगामी 24 जुलै पासून सुरु होणाऱ्या पावसाळी विधीमंडळ अधिवेशन मध्ये हक्क भंग आणणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले . या दौऱ्यात भाजपा नगरसेवक सचिन खेमा ,  झोनल रेल्वे कमिटी सदस्या कांचन खरे  , प्रवासी संघटना उपाध्याक्ष राजेंद्र फड़के , भाजपा पदाधिकारी सदा कोकने , राहुल भोईर आदिनी सहभाग घेतला . यावेळी पालिकेने फेरीवाला विरोधात करावाई ही केली .

ई सकाळ आणि सकाळच्या बातमीचा परिणाम 
स्टेशन परिसर मधील घाणीचे साम्रज्य आणि स्कायवाक़ वरील फेरीवाले विषय दैनिक सकाळ मध्ये बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या तर आज स्टेशन परिसर टैक्सी आणि रिक्षा ठेवायला जागा आहे का ? ही बातमी प्रसिध्द झाली होती , अखेर भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी आज पाहणी करत शासकीय अधिकारी वर्गाला चांगलाच सज्जड दम दिला ...

रोज दौरा करा ...
भाजपा आमदार नरेंद्र पवार हे पाहणी दौरा करणार म्हणून स्कायवॉक आणि स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त होता , यामुळे आमदार नरेंद्र पवार यांनी रोज पाहणी दौरा करा अशी मागणी नागरिक करत होते , आता आमदार नरेंद्र पवार आक्रमक झाले असून खरच स्टेशन परिसर आणि स्कायवॉक फेरीवाला मुक्त होतो का याकडे लक्ष्य लागले आहे .

Web Title: Sakal news breaking news mla narendra pawar government kalyan railway station