एपीएमसी परिसर चकाचक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

एपीएमसीत कचऱ्यामुळे दुर्गंधी’ या मथळ्याखाली गुरुवारी (ता.११) ‘सकाळ’च्या नवी मुंबई टुडे या अंकात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत भाजीपाला व फळबाजार परिसर स्वच्छ केला. 

वाशी -  ‘एपीएमसीत कचऱ्यामुळे दुर्गंधी’ या मथळ्याखाली गुरुवारी (ता.११) ‘सकाळ’च्या नवी मुंबई टुडे या अंकात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत भाजीपाला व फळबाजार परिसर स्वच्छ केला. 

एपीएमसी परिसरात उघड्यावर भाजीपाला व फळे टाकली जातात. पावसामुळे हा भाजीपाला व फळे सडून दुर्गंधी येत असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची डोकेदुखी वाढली होती. याची दखल ‘सकाळ’ वृत्तसमूहाने घेतल्यामुळे फळ व भाजीपाला परिसर एपीएमसी प्रशासनाकडून स्वच्छ करण्यात आला. यामुळे व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’ वृत्तसमूहाचे आभार मानले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal news impact in APMC aera