ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील मुजोर रिक्षाचालकांना दणका 

ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील मुजोर रिक्षाचालकांना दणका 

ठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाजवळील सॅटिस पुलाखाली वाहतूक पोलिसांनी बुधवारी साध्या वेशामध्ये तब्बल 75 रिक्षाचालकांवर कारवाई केली. सॅटिस पुलाखाली आडव्या रिक्षा उभ्या करून हे रिक्षाचालक प्रवाशांची वाट अडवत होते. यासंबंधीचे वृत्त "सकाळ ठाणे टुडे'च्या अंकात "रिक्षा चालकांची मुजोरी कायम' या मथळ्याखाली बुधवारी प्रसिद्ध झाले. त्याची गंभीर दखल घेऊन वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. यात प्रत्येक रिक्षाचालकांकडून 800 रुपयांचा दंडही वसूल केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. 

ठाणे रेल्वेस्थानक परिसरातून दिवसाला लाखो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि रिक्षाचालकांनाही रांगेची शिस्त लागावी म्हणून येथे रिक्षाचालकांना खास मार्गिका आखून दिली आहे. मात्र, त्यानंतरही काही मुजोर रिक्षाचालकांकडून सॅटिस पुलाखाली या रांगांचे नियम मोडून वेड्या-वाकड्या पद्धतीने रिक्षा उभ्या करण्यात येत होत्या. त्यामुळे स्थानक परिसरातून ये-जा करणाऱ्यांची वाट अडविली जात होती. शेअर रिक्षाच्या नावाखाली आलोक हॉटेलसमोरील रस्ताही या रिक्षाचालकांनी बळकावला होता. याचा परिणाम स्थानक परिसरातील वाहतुकीवर होत असे. या संबंधीचे वृत्तही "सकाळ'मध्ये बुधवारी प्रसिद्ध झाले. त्याची गंभीर दखल घेत ठाणेनगर वाहतूक पोलिसांनी साध्या वेशात मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई केली. रिक्षाचालकांबरोबरच बेकायदेशीररित्या उभ्या झालेल्या दुचाकींवरही कारवाई करण्यात आली. त्यानंतर हा परिसर मोकळा झाल्याने नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. 

आमच्या 20 जणांच्या पथकाने साध्या गणवेशात रेल्वेस्थानक परिसरातील 75 रिक्षाचालकांवर कारवाई केली. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील. 
- सुरेश लांभाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे नगर वाहतूक शाखा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com