दिव्यांग विद्यार्थ्याला न्याय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या एलएलएमच्या दुसऱ्या वर्षामधील चौथ्या सत्राच्या दिव्यांग विद्यार्थ्याचा प्रबंध जमा करून घेण्यास विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला होता. त्याबाबत ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. ४) प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत विद्यापीठाने विद्यार्थ्याचा प्रबंध जमा करून घेतला. 

एलएलएमच्या दुसऱ्या वर्षातील चौथ्या सत्राची परीक्षा देणारे संतोषकुमार यादव यांना लहानपणी एका अपघातामध्ये दोन्ही हात गमवावे लागले. एलएलएमच्या चौथ्या सत्रात विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करावा लागतो. तो सादर करण्यासाठी विद्यापीठाने ५ जूनपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीमध्ये संतोषकुमारला प्रबंध सादर करता आला नाही. प्रबंध सादर करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी त्यांनी विद्यापीठाकडे केली होती.

दिव्यांग विद्यार्थ्यासाठी असलेली सवलत मला दिली गेली नव्हती. माझ्यासारख्या विद्यार्थ्यावर होणाऱ्या अन्यायाची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार.
- संतोषकुमार यादव, एलएलएमचा विद्यार्थी

Web Title: sakal news impact student justice