'यिन बझ'ची गरुडझेप; 10 लाख यूजरचा टप्पा पार

Yin
Yin

मुंबई - 'सकाळ माध्यम समूहा'च्या "यिन बझ' या तरुणाईच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या पोर्टलने गरुडझेप घेतली आहे. या वर्षी 26 जानेवारीला पोर्टलची सुरवात झाली. राज्यभरातील तरुणाईने मोठा प्रतिसाद दिल्याने अवघ्या तीन महिन्यांत 10 लाख यूजरचा टप्पा पूर्ण करणारे ते राज्यातील एकमेव पोर्टल ठरले आहे.

या पोर्टलवर जगभरातील घडामोडींबरोबरच तरुणाईला भावणाऱ्या विषयांचीही माहिती दिली जाते. विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतीही "तरुणाईचे आयडॉल' या विभागांतर्गत तेथे उपलब्ध आहेत. याशिवाय या पोर्टलवरील "कॉलेज कट्टा', "मनोरंजन', "राजकारण', "व्हायरल बझ', "क्रीडा', "भ्रमंती', "फूड', "टेक', "व्हिडिओ', "लाइफ स्टाइल' आदी विभागांत विविध विषयांची माहितीही देण्यात येते.

तुम्हीही व्यक्त व्हा!
'यिन बझ'वरील "ब्लॉग'च्या माध्यमातून तुम्हीही आपले विचार लाखो वाचकांपर्यंत पोचवू शकता. yinbuzzz@gmail.com या ई-मेल आयडीवर तुम्ही आपले ब्लॉग पाठवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com