esakal | 'या सरकारने प्रायश्चित घ्यावं', साकीनाका बलात्कार घटनेवर दरेकरांचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

pravin-darekar-Uddhav-T

'या सरकारने प्रायश्चित घ्यावं', साकीनाका बलात्कार घटनेवर दरेकरांचा संताप

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: साकीनाका येथे बलात्कार (Sakinaka rape case) झालेल्या पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. अत्यंत अमानुष पद्धतीने महिलेवर अत्याचार करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी या घटनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला आहे. "मी आता हॉस्पिटललाच जाणार होतो. पण पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समजली. एकाबाजूला मनात संतापाची भावना आहे, तर दुसऱ्या बाजूला मन विषण्ण झालं आहे" असे दरेकर म्हणाले.

"या घटना वारंवार होत आहेत. खरं म्हणजे राज्यकर्त्यांबद्दल बोललो, तर राजकारण करतात, लाजा वाटत नाही असं बोललं जाईल. पण अपवादात्मक गोष्ट झाली तर जबाबदार धरु शकत नाही. पण या राज्यात रोज महिलांवर बलात्कार, खुनाच्या घटना घडत आहेत" त्या बद्दल त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

हेही वाचा: साकीनाक्यामध्ये नेमकं काय घडलं? बलात्कार पीडितेचा मृत्यू

"आता जी घटना घडली, त्याचं वर्णनही करता येत नाहीय. या सरकारने त्याचं प्रायश्चित घेतलं पाहिजे. कायद्याचा वचक कोणावरच राहिलेला नाही. निष्पाप महिलांचा नराधमाच्या कृत्यात बळी जातोय" अशी संतप्त भावना प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली.

loading image
go to top