एक पणती व्यसनमुक्तीची

एक पणती व्यसनमुक्तीची

मुंबई : देशाची नवी पिढी व्यसनमुक्त राहावी म्हणून ‘सलाम मुंबई फाऊंडेशन’ १७ वर्षांपासून तंबाखूमुक्त शाळा अभियान सरकारसोबत राबवत आहे.

दिवाळीनिमित्त ‘एक पणती व्यसनमुक्तीची’ उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. त्याअंतर्गत २७ ऑक्‍टोबर म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंगणात, देव्हाऱ्यात, सार्वजनिक ठिकाणी पणती लावून व्यसनमुक्त आणि आरोग्यसंपन्न समाजासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्य सरकारचा शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन, बजाज इलेक्‍ट्रिकल्स फाऊंडेशन आणि ‘सकाळ’तर्फे ‘एक पत्र व्यसनमुक्तीसाठी’ उपक्रम राबवण्यात आला. आतापर्यंत राज्यातील ३५० कुटुंबे व्यसनमुक्त झाली आहेत. यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांना नुकताच ‘महाराष्ट्र भूषण’ व ‘महाराष्ट्र रत्न’ सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. 

उपक्रमाचे पुढचे पाऊल म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थी, युवक मंडळ, महिला मंडळ, कंपनी व कारखान्यांना दिवाळीत ‘एक पणती व्यसनमुक्तीची’ उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. 
साधना तायडे यांनी, व्यसनमुक्तीसाठी समाजाने पुढे यावे, असे म्हटले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक डॉ. अतुल साळुंखे यांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘व्यसनमुक्त राष्ट्र’निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com