ST कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महत्त्वाची माहिती, अनिल परब यांनी केलं आहे ट्विट

सुमित बागुल
Friday, 2 October 2020

कोरोना लॉकडाऊनमुळे सरकारचा आर्थिक कणा मोडलाय. अशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा गंभीर प्रश्न राज्य सरकारसमोर आहे.  

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचा आर्थिक कणा मोडलाय. राज्याच्या आर्थिक तिजोरीवर पण मोठा ताण आलाय. गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेली राज्यातील लालपरी आता रस्त्यावर धावू लागलीये खरी, मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र थकीत आहे.

अशात आज महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. ट्विटरवरून माहिती देत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार येत्या गुरूवारी मिळणार असल्याची माहिती दिली आहे.

महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात बलात्कारासह हत्येचे सर्वाधिक गुन्हे; महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांत राज्य तिसऱ्या क्रमांकावर
 

एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. 

याआधीही ऑगस्ट महिन्यात ST कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश निर्माण झाला होता. त्यांनतर राज्य सरकारने निधी मंजूर करत ST कर्मचाऱ्याचा पगार दिला होता. 

कोरोना लॉकडाऊनमुळे सरकारचा आर्थिक कणा मोडलाय. अशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा गंभीर प्रश्न राज्य सरकारसमोर आहे.  

salaries of ST workers Anil parab spoke to dcm maharashtra said salaries will be given by Thursday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salaries of ST workers Anil parab spoke to dcm maharashtra said salaries will be given by Thursday