विक्रीकरात 3 हजार 865 पटींनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई - विक्रीकर विभाग हा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा विभाग असून, 1960 मध्ये पहिल्या वर्षीच्या 30 कोटी रुपयांची करवसुली करण्यात आली होती. या वर्षी एक लाख 15 हजार 940 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ तीन हजार 865 पट आहे.

"ही बाब निश्‍चित कौतुकास्पद आहे. विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामाचे फलित आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बुधवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते "महाजीएसटी संकेतस्थळ', "ऑनलाइन निर्धारणा', "महाजीएसटी ऍप', "महापीटी ऍप' आदी सुविधांचे लोकार्पण झाले. या वेळी कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, अर्थ विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव, वस्तू व सेवाकर आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: sales tax increase