"स्वच्छता दूत' होण्याची सलमान खानला विनंती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मुंबई - उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरोधात सुरू झालेल्या मोहिमेत अभिनेता सलमान खान महापालिकेला साथ देण्याची शक्‍यता आहे. सलमानने पालिकेला पाच फिरती शौचालये भेट दिली आहेत. या मोहिमेला बळकटी देण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. पालिकेने त्याला "स्वच्छता दूत' होण्याची विनंती केली आहे. 

मुंबई महापालिकेने "स्वच्छ भारत' मोहिमेनुसार उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे. यानुसार नवी शौचालय बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. पालिकेच्या 24 पैकी निम्म्या प्रभागांत नागरिकांनी उघड्यावर शौचास बसणे बंद केले आहे. सलमान खान पालिकेचा स्वच्छता दूत झाल्यास त्याचा नागरिकांच्या मानसिकतेवर चांगला परिणाम होईल, अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत. 

पालिकेने यापूर्वीही स्वच्छता मोहिमेविषयीच्या जनजागृतीसाठी अभिनेत्यांची मदत घेतली आहे. "क्‍लीन अप' मोहिमेच्या जाहिरातीत अनेक अभिनेते सहभागी झाले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पाणी बचतीच्या मोहिमेत सहभागी झाला होता. 

Web Title: Salman Khan to request cleaning of the angel