सलमान खानला धमकी प्रकरण! आरोपी बिश्नोईला 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lawrence bishnoi and salman khan

सलमान खानला धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी धाकडराम बिश्नोईला सोमवारी वांद्रे दंडाधिकारी न्यायलयाने 7 दिवसांची म्हणजे 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Salman Khan : सलमान खानला धमकी प्रकरण! आरोपी बिश्नोईला 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई - सलमान खानला धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी धाकडराम बिश्नोईला सोमवारी वांद्रे दंडाधिकारी न्यायलयाने 7 दिवसांची म्हणजे 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला रविवारी जोधपूर येथून अटक केल्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने न्यायलायसमोर चुकी मान्य करत मेल चुकून पाठवण्यात आल्याचे आरोपींनी सुनावणीदरम्यान सांगितले. आरोपीवर 6 महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या जामिनावर आरोपी धाकडराम तुरुंगाबाहेर असल्याची माहिती मिळत आहे.

वांद्रे कोर्टात काय घडलं?

आरोपी धाकड राम बिश्नोई याला वांद्रे पोलिसांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात सोमवारी हजर केले. कोर्टात न्यायमूर्तींनी धाकड राम यांना विचारले की तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती कोर्टात आली आहे का? तसेच तुमची बाजू मांडायला वकील आहे का? त्यावर धाकडराम यांनी 'नाही' असे उत्तर दिले. न्यायाधीशांनी धाकड रामला बाजू मांडण्यास वकील नियुक्त करण्यास सांगितले. न्यायाधीशांनी सलमान खानला ईमेल पाठवण्याबाबत विचारले असता धाकड रामने आपली चुकी मान्य करत ई मेल चुकीने पाठवल्याची कबुली दिली.

आयपी पी एड्रेसवरून अटक

18 मार्च रोजी सलमान खान याला अनोळखी व्यक्तीने ईमेल पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी ज्या ईमेल आयडी वरून हा मेल पाठवण्यात आला होता त्याचं लोकेशन ट्रॅक करायला सुरुवात केली होती . आरोपींन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे बऱ्याच वेळेला तपासात लोकेशन ट्रॅक करणे कठीण जात होतं .परंतु अखेर पोलिसांना यश मिळालं.राजस्थानमधील जोधपूर येथील 21 वर्षीय धाकड राम विश्नोई याला धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांनी तांत्रिक सहाय्यकांमार्फत धाकडचा माग काढल्याचे पोलिसंकडून माहिती मिळत आहे. जोधपूर जिल्ह्यातील लुनी गावात असलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल पत्त्यावरून म्हणजेच आय पी एड्रेसवर पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला.

सिद्धू मूसवाला कनेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांना धाकड राम विश्नोईकडूनही धमकी देण्यात आली होती. यानंतर त्याच्यावर पंजाबमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या तपासानंतर पंजाब पोलिस धाकड राम बिश्नोईलाही ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आत्तापर्यंतच्या तपासात धाकड राम बिश्नोईचा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी कोणताही संबंध समोर आलेला नाही.

गुंड गोल्डी ब्रारचेही नाव समोर

चित्रपट अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारे ईमेलमध्ये धाकडने हा ईमेल गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास सहकारी गोल्डी ब्रारच्या वतीने पाठवला असल्याचे म्हंटले होते. गँगस्टर बिश्नोईने सांगितले होते की, सलमान खानला संपवणे हे माझे उद्दिष्ट होते, त्यानंतर धाकडरामने धमकीचे पत्र पाठवले. त्यामुळे बिश्नोई गँग आणि बिश्नोई टोळीचा तसच गोल्डी ब्रार यामध्ये काही कनेक्शन आहे का याचा तपास पोलीस करत आहे.