विनोद खन्ना यांची सलमानने घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

मुंबई - अभिनेता सलमान खान याने शुक्रवारी (ता. 7) रात्री उशिरा ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

मुंबई - अभिनेता सलमान खान याने शुक्रवारी (ता. 7) रात्री उशिरा ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात खन्ना यांच्यावर उपचार सुरू आहेत. विनोद खन्ना आणि सलमान यांनी "दबंग', "दबंग-2' अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय केला आहे. मालदीव येथे सुटीला गेलेला सलमान मुंबईत परतल्यानंतर तत्काळ रुग्णालयात खन्ना यांना भेटायला गेला. ते काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: salman khan visit to vinod khanna