उल्हासनगरात मनसेचा 14 असामींना समाजभूषण पुरस्कार

Samaj Bhushan Award for 14 candidates in Ulhasnagar By MNS
Samaj Bhushan Award for 14 candidates in Ulhasnagar By MNS

उल्हासनगर- सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या 14 असामींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याशिवाय शाळेतून दहावी-बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांनाही पुरस्काररुपी शाबासकी देण्यात आली.

समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यात प्रामुख्याने गडचिरोली मध्ये काही नक्सलवादींचे एन्काऊंटर करणारे व या घडीला मध्यवर्ती ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक हर्षद काळे, अंधत्वावर मात करून जिल्हाधिकारी पदावर विराजमान झालेली प्राजंल पाटील, सीएच्या परिक्षेत देशात तिसरी आलेली समिक्षा अग्रवाल, यूपीएससी परिक्षेत उतिर्ण झालेला आशिष रावलानी, एमपीएससीच्या परिक्षेत उतिर्ण झालेली मनिषा वजाळे, पत्रकार शरद पवार, पत्रकार कमर काझी, पत्रकार गणेश गायकवाड, पत्रकार राजेश हराचंदानी, साहाय्यक पोलिस उपनिरिक्षक बि.टी.पाटील, मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे, सामाजिक क्षेत्रातील दिपक वलेचा, शिक्षण क्षेत्रातील अनिल बोरणारे, क्रीडाक्षेत्रात नावलौकिक करणारे एसएसटी महाविदयाल्याचे विद्यार्थी यांचा समावेश आहे.

या सर्व 14 असामींना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अशोक (काका) मांडले, सचिव ईरफान शेख, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव उर्मीला तांबे, मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदिप पाचंगे, मनविसेचे ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष वैभव किणी, मनविसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई, उल्हास भोईर, सचिन कदम, संदिप नावगे, प्रदिप गोडसे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे हे 9 वे वर्ष आहे. याकार्यक्रमाची उल्हासनगरकर दरवर्षी आतुरतेने प्रतिक्षा करतात. सातत्याने होणाऱ्या कार्यक्रमाची ही शाबासकी असल्याची प्रतिक्रिया आयोजक बंडू देशमुख, मनोज शेलार यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com