Vidhan Sabha 2019 : भायखळ्यात होणार 'दोस्तीत कुस्ती'ची लढत!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत आघाडीने केलेल्या जागावाटपात समाजवादी पक्षाला मानखुर्द-शिवाजीनगर, भिवंडी आणि औरंगाबाद हे तीन विधानसभा मतदारसंघ मिळाले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतील समाजवादी पक्षाचे जागावाटप बुधवारी (ता. 2) जाहीर झाले. समाजवादी पक्षाला तीन जागा सोडण्यात आल्या असल्यातरी आग्रह असलेली भायखळ्याची जागा मिळू शकली नाही. त्यामुळे या जागेवर समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांची लढत काँग्रेसचे मधू चव्हाण यांच्याशी होणार आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत आघाडीने केलेल्या जागावाटपात समाजवादी पक्षाला मानखुर्द-शिवाजीनगर, भिवंडी आणि औरंगाबाद हे तीन विधानसभा मतदारसंघ मिळाले. या निवडणुकीत सप आघाडीत सहभागी होणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. सप आघाडीतून बाहेर पडणार, अशी चर्चाही काही दिवसांपासून सुरू होती. 

अखेर बुधवारी आघाडीचे उमेदवार जाहीर झाले. सप आग्रही असूनही वाटाघाटींत भायखळा मतदारसंघ मिळाला नाही. त्यामुळे आघाडी असूनही या जागेवर सपचे नगरसेवक रईस शेख काँग्रेसचे मधू चव्हाण यांना आव्हान देणार आहेत. दरम्यान, ही लढत 'मैत्रीपूर्ण' असेल, असा दावा सपने केला आहे. 

भायखळ्यात भाजप, काँग्रेस, अखिल भारतीय सेना, सप अशी लढत होईल. सपच्या उमेदवारामुळे आघाडीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होऊन काँग्रेसला फटका बसण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : खडसे, तावडे, बावनकुळे यांना नारळ?; दुसऱ्या यादीतूनही डावलले

- Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

- Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा गड होणार आणखी मजबूत; 'हे' आहेत उमेदवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samajwadi Party and the Congress will fight against each other in Byculla