'त्या' व्हायरल फोटोवरून अमोल कोल्हे भडकले..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

सध्या संभाजी सिरीयलमध्ये संभाजी महाराजांची भूमिका करणारे अमोल कोल्हे आणि शरद पवार यांची एक पोस्ट व्हायरल होतेय. ही पोस्ट मराठी वृत्तवाहिनी ABP माझाच्या नावाने व्हायरल केली जातेय. शरद पवार यांच्या दबावामुळे संभाजी मालिका बंद केली असं म्हंटल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलंय. ABP माझा या वृत्तवाहिनीचा लोगो वापरून सदर पोस्ट फिरवली जातेय. 

सध्या संभाजी सिरीयलमध्ये संभाजी महाराजांची भूमिका करणारे अमोल कोल्हे आणि शरद पवार यांची एक पोस्ट व्हायरल होतेय. ही पोस्ट मराठी वृत्तवाहिनी ABP माझाच्या नावाने व्हायरल केली जातेय. शरद पवार यांच्या दबावामुळे संभाजी मालिका बंद केली असं म्हंटल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलंय. ABP माझा या वृत्तवाहिनीचा लोगो वापरून सदर पोस्ट फिरवली जातेय. 

बघा जमतंय का ? उपाय सुचवा, 50 लाख मिळवा 

काय म्हटलंय या व्हायरल पोस्टमध्ये : 

अमोल कोल्हेचा गौप्यस्फोट. शरद पवारांच्या दबावामुळे बंद केली स्वराज्यरक्षक संभाजी मालिका. मुस्लिमांची मते फुटू नये म्हणून घाणेरडी खेळी असं या व्हायरल फोटोत म्हटलंय.  

Image may contain: 2 people, beard, text that says "कोल्हेंचा गौप्यस्फोट: शरद पवारांच्या दबावामुळे बंद केली मालिका मुस्लिमांच्या भावना दुखू नये म्हणून शेवट दाखवु नका-शरद पवार 31 जानेवारी 2020 www.abpmajha.in"

मोठी बातमी - एमजी मोटर इंडियाद्वारे 'मार्व्हल एक्स'चे अनावरण

यावर अभिनेते अमोल कोल्हे यांनी स्वतः खुलासा केलाय. शरद पवारांनी मालिकेसंदर्भात  कधीही सूचना केलेल्या नाहीत, त्यामुळे अफवा पसरावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अनेक पोस्ट फिरत आहेत. टीका करण्यासाठी सरसावलेल्या तथाकथित बोरूबहाद्दरांनी आणि मळमळ असह्य होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सोशल मिडिया पंडितांनी मालिका संपूर्ण पहावी आणि मग प्रेक्षक या नात्याने जरूर टिप्पणी करावी. मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर सुरू आहे याची नोंद घ्यावी, अशी पोस्ट खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर लिहिली आहे. सोबतच त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केलाय. 

मोठी बातमी - विनायक मेटे यांचा राजीनामा

 

दरम्यान हे फोटो भाजपकडून व्हायरल केले जात असल्याचा आरोप केला जातोय. याबद्दल बोलताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या फोटोवर आक्षेप घेत भाजपकडून या पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याच्या आरोपाचं खंडन केलंय. 

sambhaji serial and viral images amol kolhe angry over connecting sharad pawar to such images

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji serial and viral images amol kolhe angry over connecting sharad pawar to such images