समीर भुजबळांना जामिनासाठी प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांना जामिनासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गुरुवारी न्या. अजय गडकरी यांच्यासमोर झालेल्या युक्तिवादानंतर कोणताही निर्णय झाला नाही. यावर पुढील सुनावणी 5 जूनला होणार आहे. या प्रकरणातील आरोपी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ज्या मुद्द्यावर जामीन मंजूर करण्यात आला, त्यानुसार समीर यांनाही जामीन मिळावा, असा युक्तिवाद केला जात आहे. या जामिनाला "ईडी'ची बाजू मांडणारे ऍटर्नी जनरल अनिल सिंग यांनी जोरदार विरोध केला आहे.
Web Title: sameer bhujbal bell