समीर भुजबळांना जामीन देण्यास ईडीचा विरोध

Sameer-Bhujbal
Sameer-Bhujbal

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ज्या कारणामुळे जामीन मिळाला, त्याआधारे त्यांचे पुतणे समीर यांना जामीन कसा मंजूर करता येईल, असा प्रश्‍न ऍटर्नी जनरल अनिल सिंग यांनी सोमवारी उच्च न्यायालयात ईडीच्या वतीने केला. समीर यांना जामीन देण्यास विरोध करताना त्यांनी हा युक्तिवाद केला.

समीर भुजबळ दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर न्या. अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणात आरोपी असलेले छगन भुजबळ यांना ज्या मुद्द्यावर जामीन मिळाला, त्याआधारे समीर यांनाही जामीन मिळावा, अशी विनंती त्यांचे वकील विक्रम चौधरी यांनी केली. त्यावर, सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील कलम 45(1) रद्द केले आहे.

याच्याआधारे न्या. पी. एन. देशमुख यांनी छगन भुजबळ यांना नुकताच जामीन मंजूर केला. ही बाब खरी असली तरी, पीएमएलए कायद्यात आणखी सुधारणा झाल्या आहेत. ईडी त्याबाबत माहिती घेत आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना ज्या आधारे जामीन मिळाला, त्या निकषावर समीर यांना जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद सिंग यांनी केला.

समीर यांच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्या वेळी पीएमएलए कायद्यात कोणते बदल झाले आहेत, याची माहिती ईडीच्या वतीने दिली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com