समीर भुजबळांना अखेर जामीन

Sameer Bhujbal finally gets bail
Sameer Bhujbal finally gets bail

मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांना अखेर रोख 5 लाख रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. याप्रकरणात, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ज्या मुद्द्यावर जामीन मंजूर केला त्यानुसार समीर भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी स्पष्ट केले.

भुजबळ यांना मुंबई हद्दीच्या बाहेर जाण्याबाबत अट होती. समीर भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या हद्दीच्या बाहेर म्हणजे (महाराष्ट्र गोवा) जाऊ नये अशी अट टाकण्यात आली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील कलम 45(1) रद्द केले आहे. त्याचा आधार घेत आतापर्यंत छगन भुजबळ यांच्यासह सुमारे 52 जणांना जामिन मंजूर झाला आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांना जामिन मंजूर करावा असा युक्तिवाद समीर भुजबळ यांच्यावतीने विक्रम चौधरी यांनी केला. या आधारावर उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला या जामीनाला ईडीची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी जोरदार विरोध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com