समित ठक्करला २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

सुमित बागुल
Monday, 16 November 2020

समित ठक्करला २४ ऑक्टोबररोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याववर आक्षेपार्ह टिप्पणी करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या समित ठक्करला कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.  २५ हजारांच्या जातमुचलक्यावर समित ठक्करला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय.

महत्त्वाची बातमी बिहारमध्ये भाजपने शब्द पाळला, महाराष्ट्रात शिवसेनेला शब्द दिलाच नव्हताः प्रवीण दरेकर

समीत ठक्करने ट्विटरवर ठाकरे सरकारला औरंगजेब तसेच पॉवरलेस सरकार म्हंटले होते. तर उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पेन्ग्विन असं संबोधित केलं होतं. समितचे ट्विटरवर ५९,००० फॉलोवर्स आहेत. 

समित ठक्करला २४ ऑक्टोबररोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याववर आक्षेपार्ह टिप्पणी करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती.

महत्त्वाची बातमी : मुंबईकरांची यंदाची दिवाळी शांततेत; गेल्या १५ वर्षांतील सर्वात कमी आवाजाची नोंद

सुरवातीला समितला नागपूर पोलिसांनी त्याला अटक केलेली. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली. दरम्यान नागपूर कोर्टाने त्याला जामीन दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी समित ठक्करला अटक केली होती. मुंबई हायकोर्टात त्याला सादर केल्यानंतर त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आलेली.  

दरम्यान आता समित ठक्करची २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Sameet Thakkar granted bail by a court in Mumbai on a surety of Rs 25 thousand

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sameet Thakkar granted bail by a court in Mumbai on a surety of Rs 25 thousand