समीर भुजबळ यांच्या जामिनावर आज सुनावणी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या जामिनासाठीच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात (सुटीकालीन) गेल्या आठवड्यात समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. तेव्हा अंमलबजावणी संचालनालयातर्फे बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील उपस्थित नव्हता. त्यामुळे अर्जावरील सुनावणी 15 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. 1 फेब्रुवारी 2016 रोजी समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलएम कायद्यातील कलम 45( 1) रद्द केल्याचा छगन भुजबळ यांना जामीन देताना फायदा झाला होता. त्यामुळे समीर भुजबळ यांनाही जामीन मिळण्याची आशा त्यांच्या निकटवर्तीयांना वाटत आहे.
Web Title: samir bhujbal bell result