Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर 'यामुळे' सर्वाधिक अपघात! पाच महिन्यांत ९८ घटना | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर 'यामुळे' सर्वाधिक अपघात! पाच महिन्यांत ९८ घटना

मुंबई : समृद्धी महामार्गावर वाहन चालवतांना चालकांना डुलकी आणि थकव्यामूळे सर्वाधिक अपघात होत असल्याचा महामार्ग पोलीसांनी निष्कर्ष काढला आहे. गेल्या पाच महिन्यातील अपघाताच्या सर्वेक्षणानंतर डुलकी आणि थकव्यामूळे सर्वाधीक ९८ अपघात झाले आहे.

ओव्हर स्पिडिंगमूळे ६८ अपघात होऊन त्यामध्ये सर्वाधीक ११ मृत्यु झाल्याची माहिती महामार्ग पोलीस प्रशासनाने दिली आहे. सध्या स्थितीत पहिल्या टप्याच्या समृद्धी महामार्गावर चालकांना डुलकी येऊ नये, किंवा थकवा जाणवू नये यासाठीच्या अशा कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध नसल्याने वाहन चालक थांबा न घेताच वाहन चालवणे अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे अपर पोलीस महासंचालक रविंद्र सिंघल यांनी सांगितले आहे.

पाच महिन्यातील अपघातांचे प्रकाराची संख्या

अपघाताचे प्रकार एकूण अपघात एकूण मृत्यु

टायर फुटने - ५५ ९

डुलकी / थकवा ९८ ९

तांत्रीक दोष १५ ०

ओव्हरस्पिडींग ६८ ११

वन्यजिवप्राणी ४८ १

विरुद्ध दिशेने वाहन चालवणे ० ०

मोबाईल फोनचा वापर ० ०

बेकायदा पार्किंग,ब्रेकडाऊन वाहन ११ १

मद्यसेवन करून वाहन चालवणे ० ०

इतर प्रकरण ६३ ८

एकूण ३५८ ३९

यावेळेत सर्वाधिक अपघात

महामार्ग पोलीसांच्या सर्वेक्षणामध्य़े पहाटे ६ ते दुपारी १२ दरम्यान सर्वाधीक अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये पाच महिन्यात यावेळेत ९९ अपघात आणि १२ मृत्यु झाले आहे. त्याप्रमाणेच रात्री १२ ते मध्यरात्री ३ दरम्यान ४१ अपघात ६ मृत्यु, मध्यरात्री ३ ते पहाटे ६ दरम्यान ७७ अपघात ३ मृत्यु , पहाटे ६ ते दुपारी १२ दरम्यान ९९ अपघात १२ मृत्यु, दुपारी १२ ते सांयकाळी ६ दरम्यान ७४ अपघात ८ मृत्यु, सांयकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान ३० अपघात, रात्री ९ ते रात्री १२ दरम्यान ३७ अपघात १० मृत्यु झाले असल्याचे नोंद महामार्ग पोलीसांनी केली आहे.

नागपुर रेंजमध्ये सर्वाधिक अपघात

समद्धी महामार्गावरील पहिल्या टप्यातील नागपुर विभागात सर्वाधीक अपघात झाल्याचेही या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. समृद्धी महामार्गाच्या खुर्सोपुर, जाम, धामनगांव रेल्वे, आमनी, मलकापूर या गावांचा नागपुर रेंज मध्ये समावेश आहे. पाच महिन्यात २२२ एकूण अपघात झाले असून, ३० नागरिकांनी आपला जीव गमवला आहे.

यामध्ये १९ जिवघेणे अपघात झाले तर ३४ गंभीर अपघात झाले असून, ९६ नागरिकांना गंभीर दुखपती झाल्या आहे. ६८ अपघातांमध्य़े १३३ नागरिकांना किरकोळ दुखापती झाल्या आहे. तर १०१ अपघातांमध्ये नागरिकांना कोणत्याही दुखापती झाल्या नाही. यातुलनेत औरंगाबाद रेंज मध्ये १२८ अपघात ७ मृत्यु, पुणे रेंज मध्ये ८ अपघात २ मृत्यु झाले आहे.

"वाहन चालकांना समृद्धी महामार्गावर प्रवास सुरू करण्यापुर्वीच त्यांचे प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे. त्यानंतर ताशी १२० किलोमीटर वेगाने लागणाऱ्या वेळेच्या आधीच पोहचणाऱ्या ओव्हरस्पिड वाहन चालकांची जनजागृती, शिवाय वाहनांचे टायर्स तपासल्या जाणार आहे. चालकांना डुलकी किंवा थकवा जाणवु नये म्हणून चालकांना जागी ठेवण्यासाठी छोटे कलरफुल झेंडे लावण्याचा प्रयत्न सुद्धा महामार्ग पोलीसांकडून केला जाणार आहे."

- रविंद्र सिंघल, अपर पोलीस महासंचालक (वाहतुक)