वाळूउपसा अधिकार ‘खणिकर्म’कडे

Sand
Sand

मुंबई - वाळूउपसा आणि लीलावाचे तसेच विक्रीचे सर्वाधिकार खणिकर्म महामंडळाला देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने आज गुरुवारी विधानपरिषदेत करण्यात आली.

वाळूउपशामुळे दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याची, तसेच पोलिस अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत लक्षवेधी आमदार विनायक मेटे यांनी परिषदेत मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. माजी आमदार आशिष जयस्वाल यांची खणिकर्म महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाळूउपसा आणि लीलावाबाबत खणिकर्म महामंडळाला सर्वाधिकार देण्याबाबत तसेच त्यांचीच यंत्रणा सगळीकडे कार्यरत करण्याबाबत जयस्वाल यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

वाळूमाफियांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी कडक पावले उचलण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, वाळूमाफियांवर वचक बसावा, यासाठी अधिकाऱ्यांना ठोस पावले उचलण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com