'संघर्ष शिवस्मारकाचा' पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई - अनेक वर्षे रेंगाळलेले अरबी समुद्रातील छत्रपती शिवस्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याने या संपूर्ण उभारणीचा प्रवास रेखाटणारे "संघर्ष शिवस्मारकाचा' या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन करण्यात आले. सह्याद्री अतिथिगृह येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला.

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी सुरवातीपासून केलेल्या पाठपुराव्याचे कागदोपत्री पुरावे मांडत शिवस्मारक उभारणीचे खरे शिलेदार आपणच असल्याचा दावा या पुस्तकातून केला आहे. शिवस्मारकाच्या पहिल्या मागणीपासून ते आजपर्यंतच्या सर्वच घटना, बैठका, सरकारचे आदेश, मंत्र्यांच्या भेटी, निवेदने आणि पाठपुरावा यासाठी केलेल्या सर्व कागदोपत्री पुराव्यांचा दस्तावेज म्हणजेच संघर्ष शिवस्मारकाचा हे पुस्तक आहे, असे सांगण्यात आले. आमदार विनायक मेटे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. स्मारकाच्या उभारणीचे प्रत्यक्ष काम व सर्व कायदेशीर प्रक्रिया आमच्या सरकारच्या कार्यकाळात पार पडली याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, छत्रपतींचे स्मारक उभे राहावे यासारखे सुदैवी कार्य माझ्या आयुष्यात दुसरे कोणतेही नाही. मात्र, अकारण केवळ राजकीय हेतूने टीका करणाऱ्यांना व भविष्यात नव्या पिढ्यांनाही शिवस्मारकाच्या संघर्षाचा खरा इतिहास कळायला हवा, यासाठी सर्व दस्तावेज असणारे हे पुस्तक काढल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले.

Web Title: sangharsh shivsmarak book publish