आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणतोय संजूबाबा?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तन आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिलाय. आदित्य हा माझ्या लहान भावासारखा आहे. देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज असल्याचंही संजूबाबानं म्हंटलंय. संजय दत्तने नुकताच एक व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. यात. संजय दत्त याने आदित्य ठाकरे यांना मतदान करण्याचा आवाहन केलंय. 

आदित्य ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा वारसा लाभलाय. आदित्य ठाकरे यांच्यासारख्या तरुण तेत्याची सध्या देशाला खूप गरज आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्याने निवडून यावं असं मत संजूबाबाने मांडलंय. आदित्य हा माझ्या लहान भावासारखा असल्याचंही संजय दत्तने म्हटलंय.  बाळासाहेब ठाकरे यांनी मला, माझ्या कुटुंबाला मोठा पाठिंबा दिला. ते मला वडिलांसारखे होते. बाळासाहेबांनी मला आणि माझ्या कुटुंबाला केलेली मदत मी कधीच विसरू शकणार नाही, असंही संजय दत्त म्हणालाय. 

संजूबाबाने ट्विरवर एक व्हिडिओ पोस्ट करून आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुळात संजय दत्त हा प्रिया दत्त त्यांचा भाऊ. मागील काही निवडणुकांमध्ये संजय दत्त यांनी प्रिया दत्त यांच्यासोबत अनेक कॉंग्रेस नेत्यांचा प्रचार केलाय. त्यामुळे  संजय दत्तने आदित्य ठाकरे यांना दिलेल्या शुभेच्छा भुवया उंचावणाऱ्या आहेत.   

संजय दत्तच्या अडचणीच्या काळात बाळासाहेबांनी त्याला मदत केली होती. याचीच जाणीव ठेवत संजयनं आता आदित्यसाठी मतदानाचं आवाहन केलंय अशी आता चर्चा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay dutt supports aaditya thackeray for vidhansabha elections