संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अखेर पर्यटकांसाठी खुले, सोमवारी बंद असेल उद्यान

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अखेर पर्यटकांसाठी खुले, सोमवारी बंद असेल उद्यान

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे बंद करण्यात आलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गुरुवारी केवळ 'मॉर्निंग वॉक'साठी येणा-या नागरिकांसाठी सुरू झाले. त्यानंतर प्रतिसाद आणि नियमावलीचे पालन नागरिक करत असल्याने उद्यान सुरू झाले असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनिल लिमये यांनी दिली.

प्रभातफेरी  पहाटे 5.30 ते सकाळी 7.30 वा या वेळेतच सुरू राहील. त्यानंतर सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत हे उद्यान पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. तसेच प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी उद्यान बंद राहील. सुचनांचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 8 हजाराहून अधिक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. तर अनेक पर्यटक नॅशनल पार्क पाहण्यासाठी येतात. पार्क बंद असलेल्या काळात तब्बल साडे सात कोटींचे नुकसान झाले. मात्र पार्क सुरू होत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साह आहे.

 
हे नियम पाळणे बंधनकारक

  • सद्यस्थितीतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता उद्यानातील इतर सोयी सुविधा उदा. वनराणी, व्याघ्र आणि सिंह विहार आणि नौका विहार हे सध्यास्थितीत पर्यटकांसाठी बंद राहील.
  • खाजगी वाहनांना उद्यानात प्रवेशास पूर्णतः बंदी असेल तथापि पर्यटकांच्या वाहनांकरिता (मुख्य प्रवेशद्वार येथे) सशुल्क वाहन तळाची सोय करण्यात आली आहे. 
  • पर्यटकांना उद्यानात फिरण्यासाठी बेस्टच्या बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
  • ग्रुप अॅक्टव्हिटीसाठी एकत्र येऊ नये तसेच उद्यानामध्ये कुठेही बसू नये.
  • सर्व पर्यटकांनी स्वतःच्या आरोग्याची खात्री करुनच उद्यानांत प्रवेश करावा. 
  • उद्यानात सुरक्षित अंतर वैयक्तिक संरक्षणाची साधने (मास्क आणि सॅनिटायझर्स) आवश्यक आहेत.
  • पर्यटकांनी निर्धारीत केलेल्या मार्गाचाच अवलंब करावा.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Sanjay Gandhi National Park opened tourists Mask and sanitizer compulsory

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com