नॅशनल पार्कला "प्री वेडिंग'चा फटका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

छायाचित्रणावेळी फोडले रंगीत फटाके 

मुंबई- मुंबईची फुफ्फुसे समजल्या जाणाऱ्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उत्पन्नाचे साधन म्हणून छायाचित्रणाला परवानगी दिली जाते. येथे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या काही मंडळींनी रंगांचे फटाके फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने असे प्रकार वारंवार होण्याची शक्‍यता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. 

राज्य सरकारने 2016 पासून बिबट्यांच्या अधिवासामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भाग म्हणून घोषित केले. येथे भेटी देणाऱ्या पर्यटकांसाठी काही शुल्क आकारून परवानगी दिली जाते. येथील वसंतात बहरलेली झाडे-झुडपे, निर्सगाची उधळण यामुळे अनेक छायाचित्रकारांना कमी खर्चात मोक्‍याचे ठिकाण उपलब्ध होते; मात्र या उद्यानाची नासधूस सुरू असल्याचे प्रकार सुरू आहेत. 
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने "प्री-वेडिंग शूट'साठी अनेक जण येथे भेटी देतात. 6 एप्रिलला अशाच शूटसाठी आलेल्या छायाचित्रकारांनी गुलाबी रंगाचे फटाके फोडले. 
याप्रकरणी येथील उप वनसंरक्षक अधिकारी दिनेश सिंग यांना विचारणा केली असता, असे फटाके फोडण्यास परवानगी आहे का याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले; तर वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी मात्र अशा प्रकाराला बंदी असल्याचा दावा केला आहे. यामुळे येथील जैवविविधता धोक्‍यात येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्‍त केली. 

राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र- 
59.46 किलोमीटर क्षेत्रफळ 
19.25 किलोमीटर वनक्षेत्र 

फटाक्‍यांना बंदी 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फटाके आणि हत्यारे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. छायाचित्रणावेळी फ्लॅशचा वापर करण्यासही मनाई आहे.

Web Title: sanjay gandhi national park pre wedding photoshoot