पंचायतराज व्यवस्थेपासून शिकण्यासारखे बरेच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई - पंचायतराज, जिल्हा परिषदा या व्यवस्था लोकशाहीतील सर्वांत सक्षम आणि बलशाली आहेत. विकासाचा केंद्रबिंदू म्हणून "यिन'च्या सदस्यांनी त्यांच्याकडे पाहायला हवे, असा सल्ला "सकाळ'च्या मुंबई आवृत्तीचे विशेष प्रतिनिधी संजय मिस्कीन यांनी दिला. ग्रामपंचायत ही राजकारणापलीकडे जाऊन काम करणारी व्यवस्था आहे. तिच्यापासून बरेच शिकण्यासारखे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यिन कार्यशाळेच्या शनिवारी (ता. 26) पहिल्या दिवसाच्या समारोप सत्रात मिस्कीन यांनी "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन)च्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. ते म्हणाले, की शेवटच्या माणसासोबत काम करताना पंचायतराजची बांधणी, 73व्या घटनादुरुस्तीचे महत्त्व, ग्रामपंचायतींमधील 19 प्रकारची कामे समजून घेतली पाहिजेत. लोकांशी थेट संबंध असलेल्या या व्यवस्था आहेत. त्यातील बारकावे समजून घेणे आवश्‍यक आहे.

जिल्हा परिषदेची यंत्रणाही तितकीच कार्यक्षम आणि शक्तिशाली आहे. तेथील काम कसे चालते, तसेच जिल्हा नियोजन मंडळाची कार्यपद्धती जाणून घेणे फायद्याचे ठरेल. त्यांच्याशी संबंधित सदस्य, प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी संपर्क वाढवणे हा यंत्रणा समजून घेण्याचा सोपा उपाय आहे. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प समजून घेणे आणि त्यांच्या 108 विषयांची माहिती ठेवणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मिस्कीन यांनी सांगितले.

गावाचा विकास आराखडा पाहिजे!
ग्रामीण भागातील मतदारही आता हुशार, सुशिक्षित, डिजिटल युगात वावरणारे आहेत. त्यामुळे येथील नोट आणि बाटलीचे राजकारण संपत आहे. त्याला "कॉर्पोरेट पॉलिटिक्‍स'चे नवे रूप आले आहे. प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व वाढायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Sanjay Miskin speech in YIN programme