संघ हिंसाचारी लोकांची नवी पीढी तयार करतेय : निरुपम

गुरुवार, 17 जानेवारी 2019

डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी संघ हिंसाचारी लोकांची नवी पीढी तयार करत असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी संघ हिंसाचारी लोकांची नवी पीढी तयार करत असल्याचा आरोप केला आहे.

निरुपम यांनी म्हटले आहे की, हे आरएसएसचे देशभक्त, स्वयंसेवक धनंजय कुलकर्णी डोंबिवलीत भाजपचे पदाधिकारी आहेत. यांच्या दुकानात पोलिसांनी मारलेल्या छाप्यात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला आहे. या शस्त्रास्त्रांचा साठा सांभाळून हे राष्ट्रवादाचे कोणते बीज पेरणार आहेत. आरएसएस म्हणजेच संघ हिंसाचारी लोकांची नवी पीढी तयार करत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून तब्बल 170 शस्त्रास्त्रे कल्याण गुन्हे शाखेने हस्तगत केली आहेत. धनंजय कुलकर्णी असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव होते. तो भाजपचा पदाधिकारी असल्याचेही समोर आले होते. यानंतर विरोधी पक्षांकडून भाजप आणि संघाला चांगलेच लक्ष करण्यात आले आहे.

Web Title: Sanjay Nirupam Criticises BJP and Rss on Dhanjay Kulkarni