अमित शहांच्या दौऱ्यामुळे नजरकैद - संजय निरुपम

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यामुळे पोलिसांनी पाळत ठेवत नजरकैद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे कारस्थान असल्याची टीका करत, अशा प्रकारच्या दबावाच्या राजकारणाला घाबरत नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

निरुपम यांच्या अंधेरी पश्‍चिम लोखंडवाला सर्कल येथील राहत्या घराबाहेर आणि कॉंग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या घराबाहेर आज पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत होता. कारणाशिवाय केलेल्या या पोलिसांच्या कारवाईबद्दल संजय निरुपम म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या आणि मुंबईतील कॉंग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कॉंग्रेसचा कोणताही मोर्चा, कोणतेही आंदोलन नसताना पोलिसांच्या या कारवाईचे काय कारण असू शकेल? याबद्दल जेव्हा मी बंदोबस्तातील पोलिसांना विचारणा केली असता, वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे आम्ही येथे पोलिस बंदोबस्त ठेवल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या अंदाजाने यामागचे एकच कारण असू शकते की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज मुंबईत येणार आहेत. त्यांना आमच्या प्रश्‍नांची भीती वाटते आहे असे वाटते. कॉंग्रेस कार्यकर्ते अमित शहा यांचा घेराव करतील या भीतीपोटीच अशाप्रकारे पाळत ठेवून नजरकैद केल्याचा आरोप निरुपम यांनी केला. 

Web Title: Sanjay Nirupam Questions His House Arrest