काँग्रेस नेत्यांची 'दिलजमाई' करण्यात निरुपम यांना यश 

Sanjay Nirupam
Sanjay Nirupam

मुंबई : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला काही प्रमाणात थोपविण्यात मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांना यश आले आहे. नोटबंदीच्या विरोधात मुंबईतील आरबीआय कार्यालयावरील काँग्रेसच्या घेराव आंदोलनाला बडे नेते हजेरी लावणार की नाही, याबाबत साशंकता होती. मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने एकत्रितपणे हे आंदोलन करण्यात आले असले तरीही सर्व बड्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची कसरत निरुपम यांनी यशस्वी पार पाडल्याने त्यांची पक्षातील 'पत' वाढण्यीच शक्‍यता आहे. 

नोटबंदीच्या विरोधात मुंबई आणि नागपुरातील आरबीआय कार्यालयाला काल(बुधवारी) काँग्रेसच्या वतीने घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात आले. मुंबईतील आंदोलन यशस्वी करण्याची जबाबदारी मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर होती. सहसा एकत्र न येणाऱ्या सर्व बड्या नेत्यांना एकत्र आणण्यात निरुपम यशस्वी ठरले.

या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, माजी खासदार प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, आमदार कालिदास कोळंबकर, नीतेश राणे, अमित झलक, भाई जगताप, माजी आमदार बाबा सिद्दिकी अशा सर्व बड्या नेत्यांनी हजेरी लावली. या आंदोलनासाठी दुपारी 12 वाजता मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे प्रत्यक्ष आंदोलन तब्बलदोन तास उशिरा सुरू झाले. कार्यकर्त्यांची गर्दी वाढविण्यासाठी निरुपमांनी सूत्रे हलविली. त्यानंतर बघता- बघता गर्दी वाढली आणि निरुपम यांनी सुटकेचा निः श्‍वास सोडला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिझर्व बॅंकेची स्वायत्तता संपविली असून गव्हर्नर उर्जित पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातले बाहुले झाले आहेत. मोदी सरकारने रिझर्व बॅंकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा बनविले आहे. 
- अशोक चव्हाण, काँग्रेस, प्रदेश अध्यक्ष 

आरबीआयला भाजपच्या तालावर नाचणारे बाहुले बनविणाऱ्या गव्हर्नर उर्जित पटेल यांनी त्वरित राजीनामा द्यावा. 
- संजय निरुपम, मुंबई प्रदेश अध्यक्ष काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com