संजय राऊत म्हणतायत 'त्या' सगळ्यांना क्वारंटाईन करा...

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 20 March 2020

मुंबई : सध्या जगभरात कोरोनाचं संकट घोंगावतंय. भारतावर आणि महाराष्ट्रात देखील कोरोनाचा संसर्ग वाढताना पाहायला मिळतोय. दिवसागणिक देशभरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. अशात महाराष्ट्रात गेल्या काही काळात देवेंद्र फडणवीस विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळतोय. 

मुंबई : सध्या जगभरात कोरोनाचं संकट घोंगावतंय. भारतावर आणि महाराष्ट्रात देखील कोरोनाचा संसर्ग वाढताना पाहायला मिळतोय. दिवसागणिक देशभरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. अशात महाराष्ट्रात गेल्या काही काळात देवेंद्र फडणवीस विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळतोय. 

भाजपच्या काही नेत्यांकडून 'देवेंद्र फडणवीस तुम्हीच पुन्हा मुख्यमंत्री व्हा' अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जातायत. यामध्ये Maharashtra Needs Devendra म्हणजेच महाराष्ट्राला सध्या देवेंद्र फडणवीसांची गरज आहे असं लिहिलं गेलंय. 

मोठी बातमी - ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील ४ मोठी शहरं राहणार बंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

दरम्यान यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घणाघात केलाय. भाजप कडून सुरु असलेलं ट्रोलिंग असू द्या,  ट्रेंड असू द्या. पण संकटाच्या काळात विरोधी पक्षाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करणं गरजेचं आहे. एवढा शहाणपणा जर विरोधी पक्षांकडे नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याचा अधिकार नाही. आज महाराष्ट्राने एकसंघ राहून, राजकीय मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे, असं राऊत म्हणालेत.

उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सर्वांना एकत्रित घेऊन घेऊन काम करतायत हे या पूर्वी कधीही घडलेलं नाही. आम्ही या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य करतो करतो. महाराष्ट्रात जे कुणी कुणीही अशी कामं करतायत त्यांना मोदींनी रामभाऊ म्हाळगीमध्ये शिबीर लावून संकट काळात कसं काम करायला हवं याचं चिंतन शिबीर घ्यायला हवं, असं देखील म्हणालेत. अशा सर्वांना क्वारंटाईन करायला हवं, त्यांना क्वारंटाईनची गरज आहे.   

कठीण आहे ! कोरोना घेऊनच 'तो' गेलेला लग्न समारंभाला; १००० नागरिकांच्या संपर्कात आल्याचा संशय

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकमत 

सध्याच्या संकटाच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एकमत असल्याचं संजय राऊत म्हणालेत. अशा संकट समयी देश आणि राज्य वेगळे नसावे अशी भूमिका दोन्ही नेत्यांची भूमिका आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी महाराष्ट्राला कमी मदत करतायत असा कुणी आक्षेप घेत असेल तर तो चुकीचा असल्याचं संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.  

sanjay raut comments on BJP leaders who are posting maharashtra needs devendra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut comments on BJP leaders who are posting maharashtra needs devendra