राऊतांचा राज्यपालांना वाकून कोपरापासून दंडवत, फोटो झाला व्हायरल; फोटोवर संजय राऊत राज्यपाल म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

गेल्या काही दिवसात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी गेले असताना संजय राऊत आणि राज्यपालांचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र आता या फोटोवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

मुंबई: एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करतो आहे. तर दुसरीकडे मात्र राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी गेले असताना संजय राऊत आणि राज्यपालांचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत संजय राऊत राज्यपालांना वाकून नमस्कार करताना पाहायला मिळतोय. या फोटोवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या कोरोनावरून राजकीय नाट्य रंगलं आहे. त्यात राज्याचे राज्यपाल महत्वाची भूमिका बजावत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात कोरोनाचे प्रादुर्भाव कमी करण्यामध्ये निष्फळ ठरत आहे असं  भाजपचं म्हणणं आहे. भाजपनं याबद्दल आंदोलनही केलंय. 

हेही वाचा: नजरेस कधी पडशील तू? लोकलची येते आम्हा आठवण..

याबाबदल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांनतर शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांचीव भेट घेतली होती. त्यावेळी त्यांचा राज्यपालांना वाकून कोपरापासून हात जोडून नमस्कार करणारा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. 

म्हणून केला नमस्कार: 

"भगतसिंग कोश्यारी हे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत म्हणून मी असा नमस्कार केला. आमच्यामधला संवाद चांगला झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं महाविकास आघाडीचं सरकार सुरळीतपणे सुरू आहे, असं मी राज्यपालांना सांगितलं," असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलंय. 

 

 

हेही वाचा: ठाकरे स्मारकावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक; मुंबईत राजिक्य घडामोडींना वेग

भाजपनंही लगावला टोला: 

संजय राऊतांच्या त्या फोटोवर भाजपनंही त्यांना टोला लगावला आहे. 'धडकने लगा दिल, नजर झुक गई, कभी उन से जब 'सामना' हो गया', असं ट्वीट भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलं आहे. त्यानंतर संजय राऊतांना या फोटोवर उत्तर द्यावं लागलं आहे.  

 

sanjay raut gives explanation about photo with governer of state read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut gives explanation about photo with governer of state read full story