संजय राऊतांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा; म्हणालेत...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय, सामाजिक अशा सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. 

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय, सामाजिक अशा सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. 

शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष नेहमीच एकमेकांच्या विरोधात टीका करत आलेत. अनेकदा राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर टीका केली आहे. तर शिवसेनेनंही राज ठाकरेंवर अनेकदा ताशेरे ओढलेत. काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनमध्ये महसूल वाढीसाठी दारूची दुकानं सुरु करा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता.

हेही वाचा: सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर 'या' आहेत सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...वाचा

मात्र आज राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी ट्विटरवरून राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी यात राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. 'वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..जय महाराष्ट्र,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. 

 

 

 जुने सहकारी: 

राज ठाकरे हे काही वर्षांआधी शिवसेनेतून बाहेर पडले, त्यानंतर त्यांनी वेगळा पक्षही स्थापन केला. त्याआधीपासून संजय राऊत आणि राज ठाकरे हे एकमेकांचे सहकारी होते. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे. कठीण परिस्थितीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेहमीच एकमेकांच्या सोबत राहिले आहेत. कोरोनाच्या काळात राज ठाकरेंकडून अनेकदा काही सूचना येत असतात असं खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. म्हणूनच संजय राऊतांनी आपल्या जुन्या सहकाऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा: पंतप्रधान मोदी, अंबानींचे फोटो दाखवून अडीच हजार विधवांची फसवणूक; वाचा काय आहे नेमकं प्रकरण...

मला शुभेच्छा द्यायला येऊ नका: 

"14 तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण ह्या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही आणि म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत", असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं आहे.

sanjay raut have wished raj thackeray on his birthday 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut have wished raj thackeray on his birthday